Wednesday, April 11, 2018

शिक्षणाची ऐशी तैशी


“हॅलो,प्राची?”
“हॅलो,कोण,आदिती?बोल!कशी आहेस?कित्ती दिवसांनी फोन केलास!”
“अगं हो!!विचारू नको!!सध्या लक्षच्या अॅडमिशनची धावपळ चालू आहे!!कालच हे त्या इंटरनॅशनल स्कूलचे फॉर्म घ्यायला गेले होते!काय ती गर्दी!!इतकी मोठ्ठी लाईन होती म्हणे,हे कंटाळून परत आले!!त्यावर आमचे भांडण झाले.मी म्हणलं जरा त्रास सहन केला असता तर काय बिघडलं असतं?!
ह्यांना ना मुलाच्या भविष्याची काही काळजीच नाही!!ती सध्या टॉपची स्कूल आहे.तिथले फॉर्म सुद्धा लवकर मिळत नाहीत,काय बिघडलं असतं थोडा वेळ उभे राहिले असते तर??”
“अगं हो हो,कित्ती त्रागा करून घेशील!?शांत हो जरा.”
“नाही गं,कित्ती कॉम्पिटीशन वाढलीय,त्यात आपलं मुल मागे नाही पडलं पाहिजे!आजकाल चांगल्या शाळेत अॅडमिशन मिळणं कित्ती अवघड झालंय,तू पण तुझ्या मुलीसाठी हे सगळं बघतंच असशील ना?ह्यांना काही आहे का फिकीर?आले आपले तसेच!!परवा त्या ग्लोबल स्कूलच्या इंटरव्यू ला गेलो होतो,तिथे लक्ष काही बोललाच नाही!त्याला कित्ती घरातून सगळं पढवून नेलं होतं!आता कुठली शाळा राहिली नाही शिल्लक!सगळीकडची अॅडमिशन प्रोसेस होत आलीय.”
“असं आहे तर सगळं!पण its fine!!एवढं काय टेंशन घ्यायचं त्यात?होईल ना कुठेतरी?तू उगाच hyper होतेस!!”
“बोलणं सोप्पं आहे बाई!तुझ्या लेकीचं झालं वाटतं अॅडमिशन!म्हणून एवढी निवांत आहेस तू!”
“नाही गं!मी बोललेच कुठे अजून काही!”
“ते सोड!आपल्यावेळेस कित्ती सोप्पं होतं ना गं सगळं?मला तर आठवतंय अप्पा मला अन् दादाला घेऊन गेले शाळेत,त्या principalशी बोलले,काहीतरी शे दोनशे फी असेल ती भरली आणि आलो घरी आम्ही.दुसऱ्या दिवशी शाळा चालू!!संपला विषय!!आणि आता बघा कौतुक करावं तेवढं कमी आहे!आणि एवढी उठाठेव कशासाठी,तर nurseryच्या अॅडमिशनसाठी!आणि ह्यांच्या फिया तर विचारूच नका!लाखाशिवाय बोलत नाही कुणी!!गरिबांनी शिकावं कि नाही!!आपलं पूर्ण engineering पर्यंतचं शिक्षण जेवढ्या पैशांत झालं होतं ना,तेवढी तर ह्यांची नुसती एका वर्षाची fees आहे!!पैसे काय झाडाला लागतात का?आणि बरं तुम्ही शिकवणार A B C D च ना??काय जगापेक्षा वेगळं असणारय त्यात!!नाईतर सरळ एखाद्या चांगल्या मराठी शाळेतंच टाकावं म्हणते ह्याला!मी पण तर मराठी medium मध्येच तर शिकलीय!!काही फरक पडत नाही!!”
“ते तर आहे बघ आदिती!मग कशाला ह्या सगळ्या भानगडीत पडतेस?सरळ एखादी चांगली Marathi mediumच बघ ना!”
“हो ..अगं..actually विचार करतोय आम्ही तसा पण सगळ्या शाळा लांब आहेत गं खूप!!ह्या एक दोन जवळ आहेत ना म्हणून मग तिथेच प्रयत्न चालू आहेत!!दूरची शाळा म्हणजे बस लावा आणि आत्तापासून कित्ती travelling करावं गं मुलांनी!!”
“हो ना!बरोबर आहे!”
“मुलांचं कसं हसत खेळत शिक्षण व्हावं बघ!!उगाच आपलं ते भरमसाठ पुस्तकं अन् तो homework आणि दर चार दिवसांनी कसलेतरी projects,ते करायचे कुणी?आपण!!काय शिकणार मुलं त्यातून?”
“अगं तुला एवढं सगळं समजतं ना,मग एखादी साधी शाळा बघ आणि घे तिथे अॅडमिशन!!”
“नाई ना गं!बोलणं सोप्पं आहे,practically possible नाईये ते!!”
“मला एक सांग आदिती,तुला कसली शाळा हवीय नेमकी?”
“मला काय हवंय ते महत्वाचं नाईये!आजकाल trend काय आहे ते जास्त important आहे!जवळपास सगळेच लोक आपल्या मुलांना cbse icse मध्ये घालतात!सगळीकडे जे चालू आहे तेच केलं पाहिजे ना!मला काय वाटतंय हा प्रश्न येतोच कुठे?त्यात माझ्या मुलाचं नुकसान व्हायला नाई पाहिजे!”
“नुकसान?कसलं नुकसान?”
“अरे असं काय करतेस?तो रोज सोसायटीच्या garden मध्ये खेळायला जाईल!तिथली सगळी मुलं फाडफाड English बोलणार,हा आपला गप्प उभा आहे,ठोम्ब्यासारखा!कसा दिसेल?आणि ह्याला complex येणार नाही का?उद्या जाऊन तो आम्हालाच म्हणेल मला मोठ्या शाळेत का नाही टाकलं तर काय उत्तर द्यायचं आम्ही?बाई एक तर पोरगं आहे मला,त्याच्यासाठी नाहीतर कुणासाठी करायचं सगळं?”इति आदिती.
valid point!”मी 
“माझ्या बहिणीच्या मुलीचा video पहिला का you tube वर?ती पण त्या xyz global international school मध्ये जाते!कसली English बोलते माहिती??आणि आता त्यांना French पण शिकवणार आहेत म्हणे,म्हणजे सगळ्यांनाच नाही,selected मुलांना!त्यात हिचं selection झालंय!असे फायदे पण असतात मोठ्या शाळांचे!!तिला म्हणे एका ad साठी पण विचारलं होतं,ते कुठल्यातरी मॉलमध्ये गेले होते तेव्हा,तिथेच audition पण झालं तिचं!”
“हो का?पण अगं ती फक्त ६ वर्षांची आहे ना?आत्तापासून French शिकून काय करणारय ती?तिच्या वयाला झेपेल तरी का ते?”
“इथेच चुकतो आपण प्राची!अगं आजकालची मुलं कसली हुशार आहेत!मोबाईल मधले तुला मला माहिती नाहीत तितके functions त्यांना माहिती असतात!!grasping कसलं आहे ह्या मुलांचं!काही शिकवावं लागत नाही!capacity आहे ना त्यांची तेवढी,तर मग काय हरकत आहे?”
बरोबर!मी मान्य करते कि आजकालची पिढी खरंच खूप fast aahe!!त्यांची capacity पण कदाचित जास्त असेल!अगं पण ते उचलायला तयार आहेत म्हणून काय त्यांच्यावर विनाकारण ओझं लादत जायचं?बरं,त्या ओझ्याची त्यांना खरंच गरज असते का गं आदिती?वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षी तुम्ही कसल्या अपेक्षा करतायत त्यांच्याकडून?”
“ए बाई मला काय तेवढं समजत नाही,मला एवढंच कळतं,मुलांना competition मध्ये टिकायचं असेल ना,तर हे सगळं खूप गरजेचं आहे!त्या शालिनी चा मुलगा परवा interschool competition मध्ये first आला,माहिती का?आणि अभ्यासात पण नेहमी top असतो!”
top म्हणजे?”
top म्हणजे अगं कायम ९८ ९९ टक्के असतात त्याला!”
wow!!हो का?त्याने काय होतं नेमकं?एवढे टक्के घेऊन काय करायचं?”
“अगं काय करायचं म्हणजे काय?काय position आहे आज शालीनीची सोसायटीत!!सगळे कौतुक करत असतात पार्थचं!!तिला कसलं भारी वाटत असेल ना!!”
“हो न.”
“मला तर खरं सांगते प्राची,इतका stress आलाय ना!!काय होणारय काय माहिती यार!!चल,ठेवते आता,एका school मध्ये आज seminar आहे,त्यांची admission process समजावून सांगणार आहेत.first 20 entries ला lucky draw मध्ये fees discount मिळणारय!!भारी ना?बोलू परत,bye.”
“bye aditi.”

मुल ३ वर्षाचं होतं न होतंच ह्या आणि अश्या असंख्य चर्चा आपल्याला ऐकायला मिळतात ,कधी कधी आपणही त्या चर्चेचे भाग असतो!!वरील आदिती प्रत्येक तिसऱ्या घरात आढळते!एकंदरीतच शाळा हा विषय medical engineering च्या admission पेक्षाही खूप मोठा होऊन बसलेला आहे! कुठलाही वृत्तपत्र आल्या आल्या झटकून पहा ,शाळेच्या जाहिरातीचे ३-४ pamphlet तरी सहज खाली पडतील!"Learn in stress free environment”, “we make stars here”, “we create einsteins here"!! अरे बाप रे !!Get an early bird discount of 10% on your kid's admission!!Admissions are closing soon,first come,first serve basis!" दुकानात सेल चे बोर्ड लावलेले समजू शकते!पण शाळा सुद्ध्या फियांमध्ये सवलत देते हे पहिल्यांदाच पाहिलं!!
फी हा विषय सोडून देऊ,तूर्तास!!शाळेमध्ये आज काल म्हणे विविध प्रकारच्या facilities असतात,एसी,सीसीटीव्ही कॅमेरे,तुमचं कार्ट शाळेत काय करतय हे घर बसल्या दिसतं तुम्हाला!तिकडे त्यांनी शाळेच्या आवारात पाय ठेवलं कि तुम्हाला एसएमएस येतो,"reached school"!!मी विचार करते असले sms मी शाळेत असताना येत असते तर माझी आई शाळेला म्हणाली असती ,"असले वायफळ sms पाठवण्यात पैसे वाया घालवण्यापेक्षा तुमच्या मास्तरांच्या पगारी वाढवा ,चांगल तरी शिकवतील आमच्या पोरांना!!"विषय संपला!!असो!
या hi-fi” शाळा संस्कृतीची सुरुवात झाली तरी कुठून?किंवा ह्या मोठ्ठ्या शाळा,त्यांची ती महाभयंकर प्रवेश प्रक्रिया,भरमसाठ शुल्क हा एकंदरीत प्रस्थ सुरु झाला तरी कुठून?आता कृपा करून त्या पाश्चात्य देशांना यात खेचू नका!ते बापडे आपआपल्या पद्धतीने मुलं घडवण्यात busy आहेत!किंवा आजची शिक्षण पद्धतीच फाल्तू होऊन बसलीय,शिक्षणाचा बाजार वगैरे,असले dialog मारू नका please!!ह्या उद्भवलेल्या परिस्थितीला आपण पालकच जबाबदार आहोत असं वाटत नाही का?बऱ्याच जणांना प्रश्न पडेल ,कसं काय?आम्ही कुठे म्हणालो शाळांना शुल्क वाढवा म्हणून?आम्हाला नाही हौस एडमिशन साठी  ७ ७ ८ ८ तास रांगेत थांबायची!!सगळीकडे हेच तर चालतं!आमची काय चूक आहे त्यात?माझा ह्या सगळ्या पालकांना एक प्रश्न आहे तुम्हाला नाही पटत ना हे सगळं?मग खाली मान घालून गुपचूप शाळा मागेल तेवढ्या आकड्याचे चेक फाडू नका.डोनेशन देऊ नका.करू शकाल का?नाही करू शकत.कारण कळत नकळत आपल्याला पण तेच हवंय!!खरेदी मॉल मध्ये,movie multiplex मध्ये,घरात सगळ्या सुखसोयी पाहिजेत,त्यात अजाणतेपणे भर पडली cbse,icse,IB etc etc शाळांची!कारण एक ठाम मत झालंय सगळ्याचं ,English आली तरंच आपलं मुल आयुष्यात काहीतरी करू शकेल,नाहीतर भविष्यात नुसता अंधार असेल!!ही विनाकारण निर्माण झालेली गरज  अचूक ओळखली ह्या सगळ्या व्यावसायिकांनी ज्यांचा दर्जेदार शिक्षणाशी वगैरे काही एक संबंध नाही!त्यांना शाळेच्या नावाखाली फक्त व्यापार चालवायचा आहे!त्याला बळी पडतोय आपण समस्त पालक वर्ग!!पण हे आपल्या लक्षातच येत नाही!कारण आपण डोळ्यावर झापडं घातलेली आहेत.त्यातून फक्त एवढंच दिसतं,माझं मुल कुण्या तरी भारी शाळेत जातं हे चार चौघात मान उंचावून सांगता आलं पाहिजे,माझ्या statusला ते शोभणारं पाहिजे!पैश्याला तर काही कमी नाहीच!! मग मी cbse मध्ये नाही घातलं मुलांना तर लोक काय म्हणतील?मग नातेवाईकांची मुलं तर cbse,icse मध्ये जातात,मग मी पण त्यांच्या बरोबरीत राहण्यासाठी अशाच कुठल्यातरी शाळेत घातले पाहिजे मुलांना!!माझी मुलं दुसऱ्या मुलांसारखी English नाही बोलू शकले तर?

आधी ते झापडं जरा सरकवूया आणि स्वतःला काही प्रश्न विचारूया , “चांगलं शिक्षणयाची परिभाषा माझ्या लेखी काय आहे?खरंच मला माझं मुल कसं घडवायचं आहे?तो किती ओझं पेलू शकतो?मी त्या पेक्षा जास्त तर देत नाही ना?एका शाळेकडून माझ्या काय अपेक्षा आहेत?माझा त्यात किती सहभाग असणार आहे?कि मी फक्त शाळेत प्रवेश देऊन ,त्याला एखादा महागडा क्लास ट्युशन लावून जबाबदारी पार पाडणार आहे?त्या शाळेतून बाहेर पडताना तो फक्त ९८-९९ टक्के घेऊन न येता,एक चांगला माणूस बनून पण येणार आहे का?या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली कि तशी शाळा पण नक्कीच सापडेल!फक्त प्रवाहासोबत वाहत गेलो म्हणजे आपण बरोबर आहोत असं होत नाही!बऱ्याच वेळेस त्या प्रवाहाच्या अन आपल्या गरजा वेगळ्या पण असू शकतात!त्यात चुकीचं काहीच नाही.फक्त हवीय थोडीशी स्व-जागरूकता!आणि आपल्यासाठी जे योग्य आहे तेच करण्याची ताकद!लोकांचा,समाजाचा विचार न करता!ते कुठल्यातरी वृत्त वाहिनीचं ब्रीद वाक्य आठवलं ,”उघडा डोळे,बघा नीट!!”



Cinema Bandi

Name : Cinema Bandi Language : Telugu Streaming on : Netflix Director : Praveen Kandregula Writer : Vasanth Maringanti Music Director : Saty...